Tuesday, October 24, 2017

फॉर्म-मुक्त

हायकूचा पाच सात पाच सिलाबल्सचा फॉर्म मला मराठीसाठी तितका उपयुक्त वाटत नाही. ह्या स्थळावरील बहुतेक हायकू  फॉर्म-मुक्त आहेत


-

अनंत ढवळे 

प्रतिबिंबे

कधीची  हलताहेत
तळ्यावर
संथ प्रतिबिंबे

--
अनंत  ढवळे

निथळ

शिशिरातले रंग
निथळ वर्षावागत
निथळत जाणारे


-
अनंत ढवळे 

निसर्गासारखा

समाज निसर्गासारखा
निसर्ग समाजासारखा
मी दोन्हीत नसलेला

-
अनंत ढवळे  

संघात

बाहेरच्या संथत्वात
आतला  गोंगाट
विलक्षण संघात


-

अनंत ढवळे 

वर्ष

झाडे वठू लागलीएत 
निघून गेलं आहे 
आणखी एक वर्ष 

-
अनंत ढवळे 

समकालीन गझल अनियतकालिकाचे अंक इथे उपलब्ध आहेत

समकालीन गझल अनियतकालिकाचे अंक इथे उपलब्ध आहेत :

पहिला अंक :

http://home.iitk.ac.in/~chavan/samakalin%20gazal_first%20issue%20-%20main_final_3.pdf

दुसरा अंक :

http://home.iitk.ac.in/~chavan/samakalin%20gazal_second%20issue_final.pdf